भावांनीच केला अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार, gang rape on sister by brother for 3 days

भावांनीच केला अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार

भावांनीच केला अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार

www.24taas.com, झी मीडिया, धुळे

नात्यांना काळिमा फासणारी पुन्हा एकदा एक घटना महाराष्ट्रात घडलीय... धुळे जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रोझवा, रामपूर पुनर्वसन गावाच्या शिवारात एका 15 वर्षीय मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय.

धक्कादायक गोष्ट म्हणजे ती ज्यांना ‘दादा’ म्हणून हाका मारत होती त्याच चार जणांनी तिच्यावर सलग तीन दिवस सामूहिक बलात्कार केलाय. इतकंच नाही तर यानंतर मरणासन्न अवस्थेत असलेल्या या मुलीचे हात-पाय बांधून त्यांनी तिला नाल्यात सोडून दिलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही रोझवा इथं राहते. तिच्या नात्यातील चार भावांनी तिच्याशी असलेल्या नातेसंबंधाचा फायदा घेच ती शेतात गेली असताना तिला अडवून दमदाटी केली. ‘लग्न कर’ अशी धमकीही दिली. मुलीनं नकार दिला तेव्हा त्यांनी तिला मोटरसायकलीवर जबरदस्तीने बसवून तोंडावर रूमाल बांधून जंगलात नेले. या चौघांनी संगनमताने सलग तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे हातपाय बांधून तिला एका नाल्याच्या काठी सोडून दिलं.

सुदैवानं जिवीत हाती लागलेल्या पीडितेनं तळोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यानुसार तावा रूपसिंग पावरा, गोटया रूपसिंग पावरा, सुंदा रूपसिंग पावरा, दाखलसिंग रूपसिंग पावरा या चौघा भावांविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही. के. जाधव करीत आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 11, 2014, 11:18


comments powered by Disqus