नाशिकमध्ये गँगवॉर! Gang war in Nashik

नाशिकमध्ये गँगवॉर!

नाशिकमध्ये गँगवॉर!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिकमध्ये टोळक्यांचा धुडगूस गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दहा पंधरा जणांच्या टोळक्यानं मारहाण करण्याच्या आणि त्या मारहाणीत खून झाल्याच्या घटना ताज्या असतानाच नाशकात आता गँगवॉरला सुरुवात झालीय.

नाशिकच्या सातपूररोडवर सोमवारी संध्याकाळी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही बाजूने दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं एकमेकांवर लाठ्या-काठ्या, हॉकी स्टिकनं हल्ला केला. यातले अनेक जण दारूच्या नशेत होते.

त्रंबकरोडवरच्या एका हॉटेलबाहेर गाडी लावण्याच्या कारणावरून या दोन गटांत वाद झाला. या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं. या प्रकरणी ९ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 11, 2013, 19:15


comments powered by Disqus