नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी केला गँगरेप! Gangrape in Nashik

अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी केला गँगरेप!

अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी केला गँगरेप!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिक शहरात एका अल्पावयीन मुलीवर आठ मुलांनी सामुहिक बलत्कार केल्याचं उघड झालं आहे. मुलीने तक्रार नोंदविल्याने चार जणांना अटक करण्यात आलीये. सर्व आरोपी तरुण वीस ते चोवीस वयोगटातील असून नाशिकच्या हॉटेल मनेजमेंट शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा यात सहभाग असल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे .

नाशिकपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेले पिपळगाव....या गावातून नाशिकला शिकणे आणि छोटीशी नोकरी करून घराला हातभार लावणाऱ्या सतरा वर्षाच्या मुलीची ओळख किरण पाटील या मुलाशी झाली. मित्र म्हणून या मुलाने तिला पंचवटीतील एका मुलाच्या फ्लॅटवर नेले. तेथे असलेल्या त्याच्या तिघा मित्रांनी तिच्यावर बुधवारी बलात्कार केला. आणि बदनामी करू असे सांगत तिला कोंडून ठेवले. दुसऱ्या दिवशी पुन्हा अजून नवीन चार मित्र घेऊन या मुलीचे शारीरिक शोषण करण्यात आले. दिल्लीतील झालेल्या घटनेनंतर नवीन झालेल्या कायद्याप्रमाणे पहील्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीची परिस्थिती गंभीर असून तिच्यावर सरकारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. तिच्या पालकांनी आणि तिने हिम्मत दाखविल्यानेच ही घटना समोर आलीये.पोलिसांनी तिच्या तक्रारीनुसार चौघाना अटक केली असून चार जणांचा पोलीस शोध घेत आहेत. यातील काही जण राजकीय पक्षांच्या नगरसेवकांशी संबधित असल्याचे समोर आळा आहे.. तीन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना निफाड न्यायालयात दाखल करण्यात आलं.

नवीन विधेयकानुसार अशा स्वरूपाचे खटले चालवण्यासाठी महिला कर्मचारी आणि महिला न्यायाधीश आवश्यक आहेत. आवश्यक असलेल नावीन विशेष न्यायालय स्थापन न झाल्याने पोलिसांची खुपच धावपळ झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 30, 2013, 17:27


comments powered by Disqus