महागाईत चक्क सिलिंडरचीही चोरी!, gas cylinder robbery

महागाईत चक्क सिलिंडरचीही चोरी!

महागाईत चक्क सिलिंडरचीही चोरी!
www.google.com, नाशिक
तुमच्या घरातले सिलिंडर आता जपून ठेवा, कारण चोरट्यांचा आता तुमच्या गॅस सिलिंडरवर डोळा आहे. होय, नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडलीय. महागाईनं इतका कळस गाठलाय की आता चक्क गॅस सिलिंडर्सची चोरी होऊ लागलीय.

शहरातल्या चोऱ्या आणि घरफोड्यांमध्ये आता चक्क भरलेल्या गॅस सिलिंडर्सच्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. उंटवाडी परिसरात झालेल्या घरफोडीत लाखोंच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांबरोबर चोरांनी दोन गॅस सिलिंडरही चोरून नेले आहेत. ‘चोरांनी घरातली तिजोरी फोडून मौल्यवान वस्तू तर नेल्याच पण स्वयंपाक घरातले दोन गॅस सिलिंडरही चोरटे घेऊन गेलेत’ असं पीडित किरण कदम यांनी म्हटलंय.

गेल्या आठवड्यात तारवालानगरमधल्या अशाच एका घटनेत सिलिंडर चोरीला गेले होते. वाढत्या महागाईमुळे आता सिलिंडरलाही सोन्याचं मोल आलंय, हेच यावरुन दिसून येतंय.

First Published: Wednesday, October 3, 2012, 09:53


comments powered by Disqus