जळगाव `एमआयडीसी`त वायुगळती; ३ जण अत्यवस्थ , gas licked in jalgaon midc

जळगाव `एमआयडीसी`त वायुगळती; ३ जण अत्यवस्थ

जळगाव `एमआयडीसी`त वायुगळती; ३ जण अत्यवस्थ
www.24taas.com, जळगाव
जळगाव एमआयडीसीमध्ये वायूगळती झालीय. जवळजवळ ६० कामगारांना यामुळे चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवतोय तर तीन कामगार अस्वस्थ आहेत.

जळगावातल्या एमआयडीसी भागातल्या’ कल्पतरू’ या कंपनीत आज वायगळतीची घटना घडलीय. क्लोरीन वायुची गळती झाल्यानं ही घटना घडल्याची समजतंय. जवळजवळ ६० कामगारांना यामुळे चक्कर आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यांना ताबडतोब हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. यावेळी तीन कामगार अस्वस्थ होते. सध्या, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

गेल्या काही वर्षांपासून या कंपनीत वारंवार वायुगळतीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत कामगारांनी वारंवार तक्रार करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या कंपनीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचं कामगारांनी म्हटलंय.

First Published: Sunday, October 7, 2012, 14:10


comments powered by Disqus