Last Updated: Saturday, April 13, 2013, 10:18
www.24taas.com, नाशिक नाशिकमध्ये एका नराधम पित्यानं आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. गेल्या चार महिन्यांपासून पीडित मुलगी आपल्या पित्याच्याच अत्याचाराला बळी पडत होती.
पंचवटीतील पेठरोडवरील फुलेनगर परिसरात १७ वर्षीय मुलीवर पित्यानेच बलात्कार केल्याचं उघड झालंय. गंगापूर रोडवरील एका खासगी आयटीआयमध्ये कामाला असलेल्या या नराधम पित्याडूनच मुलीवर गेल्या चार महिन्यापासून अत्याचार सुरू होता. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार आहे.
फुलेनगर परिसरांत राहणाऱ्या आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या नराधम बापावर - राजेंद्र शिवप्रसाद खरात याच्यावर - गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित मुलगी तिच्या आई व वडिलांसह फुलेनगरमध्ये राहत असून तिच्या एका बहिणीचे व भावाचे लग्न झाले असल्याने ते कुटुंबासह गंगापूररोड परिसरात राहत आहेत. दरम्यान घरात आई-वडिलांसह राहणार्यात पीडित युवतीवर डिसेंबर २०१२ पासून तिचे वडील अत्याचार करत होते. सदर मुलीची आई सीबीएस परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करते. दुपारी दोन वाजता कामास गेल्यानंतर रात्री ११ वाजता घरी येत असल्यानं या वेळेत ही मुलगी घरात एकटी असे. डिसेंबर २०१२ मध्ये रात्रीच्या वेळी ही मुलगी घरात एकटी असताना तिला चाकूचा धाक दाखवून तिच्या बापानंच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही गोष्ट कोणाला सांगितली मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे या मुलीनं ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही.
त्यानंतर अशाच प्रकारे दमदाटी करून तिच्या वडिलांनी तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला. मात्र, या घटनेनंतर पीडित मुलीस त्रास झाल्याने तिने तिच्या बहिणीला हा सर्व प्रकार सांगितला. बहिणीने तिच्या वडिलांना जाब विचारला मात्र तिलादेखील दमदाटी करून सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. यानंतर बहिणीने तिच्या आईला सर्व प्रकार सागितला. गेले दोन महिने पीडित मुलगी तिच्या बहिणीच्या घरी राहिली. यानंतर मार्च महिन्यात दहावीची परीक्षा सुरू होणार असल्याने पुन्हा फुलेनगरमधील घरी राहण्यास आली. त्यावेळी तिची आजी तिच्यासोबत होती. परीक्षा संपल्यानंतर आजी निघून गेली. त्यामुळे पुन्हा पित्याकडून लैंगिक अत्याचार सुरू झाले. त्यामुळे सततच्या त्रासला कंटाळलेल्या त्या मुलीने तिच्या आईला सर्व प्रकार कथन करून याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिचा नराधम बाप फरार झालाय. पोलीस त्याच्या शोधात आहेत.
First Published: Saturday, April 13, 2013, 10:18