Last Updated: Monday, October 7, 2013, 20:32
www.24taas.com, झी मीडिया, येवलानवसपूर्तीसाठी लोक काय काय करतील, याचा नेम नाही. येवले तालुक्यातील कोटमगावमध्ये नवसपूर्तीचा असाच अफलातून प्रकार सुरू आहे.
नवरात्रौत्सव सुरु असतांना आजपासून कोटमगावच्या जगदंबा मंदिरासमोर महिलांनी स्वत:ला उलटे टांगून नवस फेडायला सुरुवात केलीय. तिस-या माळेपासून सुरू झालेली ही नवसपूर्तीची काहीशी अघोरी प्रथा आता दस-यापर्यंत सुरूच राहणार आहे. आता याला श्रद्धा म्हणायचं की अंधश्रद्धा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. त्याशिवाय नवरात्रौत्सवात स्वतःच घटी बसण्याचीही परंपरा कोटमगावात आहे.
या काळात संपूर्ण ९ दिवस भाविक आपले घरदार सोडून मंदिरात येतात आणि मंदिर परिसरातील भक्त निवासांमध्ये उपवास करीत घटी बसतात. जवळपास २ हजार महिला अशाप्रकारे कोटमगावात घटी बसल्या आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 7, 2013, 20:32