Last Updated: Wednesday, December 26, 2012, 14:23
www.24taas.com, नाशिकदिल्लीतील गँगरेप प्रकरणी सुरु असलेल्या निषेधाचे पडसाद नाशिकमध्ये उमटले. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर विद्यार्थिनीनी मोर्चा काढून आता सहन करणार नाही असा इशाराच सरकार आणि मुलींची छेड काढणा-यांना दिला.
हॉकी टीमच्या सदस्य असणाऱ्या या विद्यार्थिनी हातात हॉकी स्टिक घेऊनच रस्त्यावर उतरल्या. दिल्लीतील आताचार सहन करणाऱ्या तरुणीला स्वास्थ्य लाभावं अशी प्रार्थना करतानाच मुलींच्या वाटेला कुणी जाऊ नये अशा इशारा दिला. सरकार पोलीस आणि कायदे आपलं रक्षण करत नाही. आम्ही आमच्या रक्षणासाठी सज्ज आहोत असा संदेश देत भयभीत झालेल्या महिला वर्गाच या मुलींनी मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केलाय.
तर दुसरीकडे पंचवटी मेडिकल असोशिएशनच्या वतीन पोलीस आयुक्तांना निवेदन देवून घटनेचा निषेध करण्यात आला. भाजपच्या वतीन विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं.
First Published: Tuesday, December 25, 2012, 23:39