हॉरर किलिंग : बहिणीला ट्रॅक्टरखाली चिरडलं, honour killing : borther killled sister in jalgaon

हॉरर किलिंग : बहिणीला ट्रॅक्टरखाली चिरडलं

हॉरर किलिंग : बहिणीला ट्रॅक्टरखाली चिरडलं
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

बहिणीनं प्रेमविवाह केल्याचा मनात ठेऊन तिच्या चिमुकल्या मुलीसमोरच तिला भावानंच ट्रॅक्करखाली चिरडून ठार केलंय. ही धक्कादायक घटना घडलीय जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात...

नातेसंबंधाला तिलांजली देणारी ही धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. हनुमंत खेडे सीम इथल्या कृष्णा मोरे (२८ वर्ष) आणि वैशाली पाटील (२७ वर्ष) यांची २०१२ मध्ये विरोधाला झुगारून प्रेमविवाह केला होता.

जुलै २०१३ मध्ये कृष्णा आणि वैशाली हनुमंतखेडे सीम येथे राहायला आले होते. पण, वैशालीच्या भावाच्या मनात मात्र वैशालीनं प्रेमविवाह केल्याचा राग कायम होता. दरम्यान, कृष्णानं गावातच ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम सुरू केलं होतं.

शुक्रवारी सकाळी वैशालीच्या १७ वर्षीय भावाला विलासनं (अल्पवयीन असल्यानं बदलंलेलं नाव) आपला राग काढला. वैशाली आपल्या मुलीसोबत जात असताना विलासनं तिच्या अंगावर ट्रॅक्टर चढवला.... यावेळी, वैशालीच्या खांद्यावर असलेली तिची चिमुरडी दूर फेकली गेली.

विलासचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही. त्यानं दोन वेळा ट्रॅक्टर मागे-पुढे करून तिच्या अंगावरून नेला. या घटनेत वैशालीचा जागीच मृत्यू झाला. कासोदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून कैलासला ताब्यात घेतलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 15, 2014, 14:51


comments powered by Disqus