Last Updated: Monday, February 3, 2014, 22:26
www.24taas.com, झी मीडिया, निफाडनिफाड सामूहिक बलात्कार प्रकरणी धक्कादायक बातमी आहे... याप्रकरणी हत्या झालेल्या महिलेचा पती भारत यालाच अटक करण्यात आलीय. महिलेच्या पतीनंच साथीदारांकरवी हल्ल्याचा बनाव केला आणि त्या महिलेला ठार मारलं.
सिन्नर तालुक्यातल्या कोळगावमधून हे दोघं पती-पत्नी बाईकवरून जळगाव जिल्हातल्या रावळगाव इथे गेले होते. रात्री ८.३० वाजता चार वाटमाऱ्यांच्या एका टोळीनं त्यांना अडवलं आणि जबर मारहाण केली... त्यांनी महिलेच्या पतीचा शर्ट आणि बनियन काढला, त्यानंच त्याचे हातपाय बांधले आणि त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. या महिलेला उचलून आतल्या बाजूला नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर त्यांनी अत्यंत निर्दयपणे धारदार शस्त्रानं तिचा गळा चिरला आणि तिथून पलायन केलं... या घटनेचा शोध घेताना पोलिसांना तिच्या नवऱ्यावरच संशय आला. या दोघांमध्येही कुरबुरी सुरू होत्या. ही महिला पतीपासून वर्षभर दूर म्हणजे माहेरीच राहात होती. तसंच त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचंही समोर आलंय.
रविवारची नेमकी घटनारविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची बाईक वाकड शिवारात आली... तिथं चार वाटमा-यांच्या एका टोळीनं त्यांना अडवलं आणि जबर मारहाण केली... घाबरलेल्या जोडप्यानं आपल्याजवळचं सगळं दरोडेखोरांना देण्याची तयारी दाखवली. पैसे-सोनं असा मिळून सुमारे १६ हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी घेतलाच... पण तितक्यावर त्यांचं समाधान झालं नाही... या नराधमांना या महिलेचा सर्वात मोठा दागिना, म्हणजे तिची आब्रूदेखील लुटायची होती... त्यांनी तिच्या पतीचा शर्ट आणि बनियन काढला, त्यानंच त्याचे हातपाय बांधले आणि त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. या चार राक्षसांनी महिलेला उचलून आतल्या बाजूला नेलं आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला... त्यानंतर त्यांनी अत्यंत निर्दयपणे धारदार शस्त्रानं तिचा गळा चिरला आणि तिथून पलायन केलं...
काही वेळानं मारहाणीत जखमी झालेल्या पतीनं आपली सुटका करून घेतली आणि मोबाईलवरून आपल्या सासऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि थोड्या वेळानं लासलगाव पोलीस पथक घटनास्थळी पोहचलं. मात्र तोपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला होता...
मात्र आता या प्रकरणात आलेला ट्वीस्ट अगदी धक्कादायक आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 3, 2014, 22:26