गोपिकाआजी... एक आश्चर्य!, jalgoan gopikabai sarswat, a old wonder

गोपिका आजी... एक आश्चर्य!

गोपिका आजी... एक आश्चर्य!
www.24taas.com, जळगाव

जळगावमधील एक आजीबाई सध्या सर्वांच्याच आश्चर्याचा विषय ठरत आहेत.

जळगावमध्ये राहणाऱ्या गोपिकाबाई सारस्वत... वय वर्षे १०५... मात्र, आजही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे आणि स्वत:ची कामंही त्या अजून स्वत:च करतात. सध्या त्या चर्चेत आल्याएत त्या त्यांच्या शारीरिक बदलांमुळे... आजीबाईंना आता तिसऱ्या टप्प्यातील दात येऊ लागलेत आणि त्यांच्या डोक्यावरील पांढरे केसही काळे होत आहेत.
जगातील सर्वाधिक वयाच्या बेस कूपर या जॉर्जियन आजीबाईंचा नुकताच म्हणजे ५ डिसेंबरला मृत्यू झाला तर भारतातल्या सर्वाधिक वयाच्या अमरावतीतल्या सोवनीअक्का यांच्यासह अन्य दोघांची नेहमीच याबाबत चर्चा होत असते. जळगावमध्ये मात्र सध्या गोपिकाबाईंमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

First Published: Tuesday, December 11, 2012, 16:18


comments powered by Disqus