Last Updated: Tuesday, September 11, 2012, 17:16
www.24taas.com, नाशिक २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अबू जिंदालला नाशिकच्या मोक्का कोर्टानं १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
२००५ मध्ये मालेगावात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा सापडला होता. तसंच यावेळी आरडीएक्सचाही साठाही आढळून आला होता. याप्रकरणी अबूला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. शस्त्रास्त्र साठा आणण्यात स्थानिक लोकांचा सहभाग उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे अबू जिंदालच्या चौकशीतून नेमकी काय माहिती बाहेर येणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
First Published: Tuesday, September 11, 2012, 17:16