Last Updated: Tuesday, October 23, 2012, 14:27
www.24taas.com, नाशिक नाशिकमध्ये आस्थेचा दरबार भरविणाऱ्या बाबानं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलीय. बाबाच्या भक्तांनीच बाबाविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आता सुटका करुन घेण्यासाठी बाबाची धावपळ सुरू आहे.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरात उभारण्यात आलेलं लड्डूगोपाल महाराजांचं आस्था भवन आहे. काल-परवापर्यंत या आश्रमात सगळ्यांना प्रवेश मिळायचा. आता मात्र या आस्था भवनाला कुलूप लागलंय. या आस्था भवनातल्या बाबानं भक्तांकडून फसवणूक करुन सोन्या-चांदीचे दागिने घेतले आणि लाखो रुपयांची माया जमा केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये या बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बाबाच्या कुटुंबीयांनी मात्र सर्व आरोपांचा इन्कार केलाय. त्याचबरोबर लड्डूगोपाल बाबा सध्या भेटू शकणार नाहीत, असं किर्ती शर्मा म्हणजेच बाबांच्या पत्नीकडून सांगण्यात येतंय.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात बाबाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बाबाला २९ ऑक्टोबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. ट्रस्ट स्थापण्यासाठी दिलेल्या पैशातून गैरव्यवहार केल्याचा आरोप बाबावर आहे.
First Published: Tuesday, October 23, 2012, 14:27