सुरेश वाडकरांच्या जमिनीचा वाद मिटला, Land Issue of Suresh Wadkar solved

सुरेश वाडकरांच्या जमिनीचा वाद मिटला

सुरेश वाडकरांच्या जमिनीचा वाद मिटला
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

सुरेश वाडकर यांच्या नाशिकमधल्या मुक्तीधाम जवळच्या जमिनीचा वाद मिटलाय. नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी या जमिनीची मालकी वाडकरांना देण्याचा निर्णय घेतलाय.

गेल्या पाच वर्षांपासून नाशिक रोड परिसरातल्या या जमिनीच्या व्यवहारात सुरेश वाडकर आणि सोनु निगम यांचे कोट्यवधी रुपये अडकले होते. खरेदी विक्री करताना महसूल यंत्रणेनंच फसवणूक केल्याचा वाडकरांचा आरोप होता. असल्या घोटाळ्यांपेक्षा परदेशात जाऊन राहिलेलं बरं, असं म्हणत त्यांनी सरकारचे वाभाडेही काढले होते.

अखेर आता त्यांच्या मालकीची जमीन झाल्यानंतर वाडकरांना दिलासा मिळालाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 8, 2013, 21:35


comments powered by Disqus