Last Updated: Thursday, February 21, 2013, 15:51
www.24taas.com, नाशिकपत्रकारितेला काळीमा फासत एका मुलीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. कोर्टाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
मतीन रहीम खान हा स्थानिक वृत्तवाहिनीचा पत्रकार आपल्या मैत्रिणीकडे एक मुलगी आली असताना घरात चोरून शिरला. तेथे ही मुलगी एका मुलासोबत असताना तिचे चोरून अश्लील फोटो त्याने काढले. तसंच त्याने तेथे व्हिडिओ शुटिंगही केलं. त्यानंतर आपण हा व्हिडिओ आणि फोटो वृत्तवाहिनीवर दाखवू अशी धमकी दिली. हे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक न करण्याच्या बदल्यात त्याने मुलीकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती.
मुलीने यावर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून मातिन खानला रंगेहाथ पकडलं. त्याला सध्या दोन दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
First Published: Thursday, February 21, 2013, 15:51