महापालिकेवर सोडलं कुत्रं, समोर आलं जुगाराचं चित्र! MNC employee playing cards

महापालिकेवर सोडलं कुत्रं, समोर आलं जुगाराचं चित्र!

महापालिकेवर सोडलं कुत्रं, समोर आलं जुगाराचं चित्र!
www.24taas.com, नाशिक

नाशिक महानगर पालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत पत्ते कुटताना आढळून आले आहेत. महानगर पालिकोवर कुत्रा सोडायला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार पाहायला मिळाला.

मेनरोड इथल्या महापलिकेच्या आरोग्य विभागाच्या तातडीच्या संच कार्यालयात भरदुपारी साडेतीन चारच्या सुमारास पत्यांचा डाव चांगलाच रंगला होता. मात्र माध्यमांचे कॅमेरे पोहचताच कर्मचा-यांची एकच पळापळ झाली. कुणी तोंड लपवीत होत, तर कुणी पत्ते लपवीत होत. अखेर टेबलवरच जुगारी कर्मचारी पत्ते टाकून फरार झाले. कार्यालयाच्या बाहेर एक कर्मचारी पत्यांचा कँट लपविताना कँमेरात कैद झाला. एवढ होऊनही तंबाखू मळण्याची आणि खाण्याची हौस कर्मचारी पूर्ण करत होते.


शहरात कुत्र्यांचा हैदोस वाढलाय. सिडको सातपूरसह जुने नशिक भागातील लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वाढल्याने आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यालयात पोहचले असता हा प्रकार उघडकीस आला.

First Published: Monday, April 8, 2013, 22:09


comments powered by Disqus