Last Updated: Tuesday, October 22, 2013, 11:21
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक डॉक्टरांवर सुरू असलेल्या कारवाई विरोधात पुणे महापालिकेच्या सभागृहात काल मनसेच्या नगरसेवकांनी अनोखं आंदोलन केलं.
यावेळी आंदोलनकर्त्या नगरसेवकांनी सभागृहात येताना डॉक्टरांचा पेहराव केला आणि डॉक्टरांना प्रतिकात्मक सलाईन लावत महापालिकेकडून डॉक्टरांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला. सध्या डॉक्टरांची नोंदणी करताना महापालिकेचे अधिकारी छोट्या किरकोळ कारणांवरून डॉक्टरांवर गुन्हे दाखल करत आहेत.
नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे नियम अतिशय किचकट आहेत. डॉक्टरांची ही गळचेपी थांबली नाही तर यापुढं मनसे अजून तीव्र आंदोलन करेल, असं मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी सांगितलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, October 22, 2013, 11:21