मनसेला अखेर खिंडार पडले....., MNS Hemant Godse in Sivsena... Nashik MNS Issue

मनसेला अखेर खिंडार पडले.....

मनसेला अखेर खिंडार पडले.....
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य हेमंत गोडसे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र करून मोठा धक्का दिलाय. उद्या शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर गोडसे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत समिर भुजबळांना गोडसेंनी जोरदार टक्कर देत २ लाख १६ हजार मत मिळवली होती.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गोडसे इच्छुक होते. मनसेकडून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची धारणा असल्याने त्यांनी शिवसेनचा रस्ता पकडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. पक्षातून ‘साईड ट्रकला’ टाकलं जात असल्याची भावना गोडसे यांनी काही माध्यम प्रतिनिधीसमोर बोलून दाखवली होती. मनसेनं गोडसे यांना मागील पंचवार्षिक मध्ये खासदारकीची उमेदवारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक ही पद दिल्याचा मनसेचा दावा आहे.

दरम्यान शिवसेनेन जरी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी गोडसे यांना तिकीट देण्याची तयारी दाखविली तरी शिवसेनेत असंतोष उफाळण्याची दाट शक्यता आहे. निष्ठावंताना डावलून नव्या लोकांना संधी देवू नये अशी प्रतिक्रीया पदाधिकारी देतायेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 1, 2013, 13:23


comments powered by Disqus