मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच! MNS leading to privatization!

मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच!

मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

खाजगीकरणाला विरोध करत नाशिक शहराची सत्ता काबीज करणाऱ्या मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच सुरु झालीय. निमित्त आहे शहरातला खत प्रकल्प... कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला खत प्रकल्प बंद असल्याचं कारण देत आता हा प्रकल्प खासगी ठेकेदारांकडे सोपवण्याचा सत्ताधा-यांचा मानस आहे.

नाशिकमध्ये शिवसेना भाजपच्या सत्ता काळात सुरु झालेला हा खत प्रकल्प उद्धघाटनानंतर काही दिवसांतच बंद पडलाय. स्थायी समितीच्या सभापतींनी नुकतीच या खत प्रकल्पाला भेट दिली तेव्हा कोट्यवधी रुपये खर्च केलेली यंत्रसामुग्री बंद अवस्थेत आढळली. त्यामुळे यासर्व खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खुद्ध सभापातींनीच करत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. तर त्याचा अहवाल येण्याआधीच मनपा कर्मचारी आणि अधिकारी योग्य रीतीने काम करत नसल्यान खाजगीकरनच्या माध्यामतून चालविण्याचा मानस सत्ताधारींच्या आहे. तर प्रकल्प ठेकेदारांच्या हाती सोपवण्याला विरोधी पक्ष आणि कर्मचारी संघटनांनी विरोध केलाय.

जकात खाजगीकरणाला विरोध करणा-या मनसेनं सत्ता हाती येताच आधी घंटागाडी प्रकल्प ठेकेदारांकडे सोपवला आणि आता खत प्रकल्पाबाबतही त्यांचा तोच मानस आहे. त्यामुळे आधीच्या सत्ताधा-यांचीच री मनसे ओढत असल्याची टीका आता होऊ लागली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 7, 2013, 19:47


comments powered by Disqus