त्र्यंबकेश्वर पालिका नगराध्यक्ष निवडणुकीत मनसेची बाजी , MNS Mayor Election won by the Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर पालिका नगराध्यक्ष निवडणुकीत मनसेची बाजी

त्र्यंबकेश्वर पालिका नगराध्यक्ष निवडणुकीत मनसेची बाजी
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर महानगरपालिकेत नगराध्यक्ष निवडणुकीत मनसे बाजी मारत आपली सत्ता राखली आहे. सर्वाधिक सहा जागा मिळविलेल्या मनसेची पालिकेत सत्ता आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत मनसे उमेदवार यशोदा अडसरे यांनी बाजी मारली.

यशोदा अडसरे यांच्या बाजूने मनसे -६, भाजप -१, शिवसेना-१, अपक्ष- १ एकूण = ९ तर राष्ट्रवादीच्या अलका शिरसाट यांच्या बाजूने राष्ट्रवादी -४, काँग्रेस -३ आणि अपक्ष- १ अशी एकूण = ८ मते पडलीत. त्यामुळे मनसे उमेदवार यशोदा अडसरे या केवळ एका मताने विजयी झाल्यात. १७ पैकी ९ मते यशोदा अडसरे यांना पडलीत.

पालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार फिल्डींग लावली होती. तशी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, चार जागा असणाऱ्या राष्ट्रवादीला आपली चमक दाखविता आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अलका शिरसाट यांचा एका मतेने पराभव झाला. निकाल हाती येताच मनसेने जोरदार जल्लोष साजरा केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 21, 2014, 14:42


comments powered by Disqus