मनसेला सुहास कांदेंचा रामराम, शिवसेनेत प्रवेश, MNS suhas kande join Shiv sena

मनसेला सुहास कांदेंचा रामराम, शिवसेनेत प्रवेश

मनसेला सुहास कांदेंचा रामराम, शिवसेनेत प्रवेश

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नाशिकमधले मनसेचे माजी पदाधिकारी सुहास कांदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय... मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केलाय... यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थितीत होते...

नाशिकमधल्या बाईक जळीत कांडानंतर मनसेतून त्यांची हकालपट्टी झाली होती... गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सुहास कांदे तडीपारही होते...

सुहास कांदे याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

...तर नाराजांनी पक्ष सोडून जावे – उद्धव ठाकरे
माझ्या नेतृत्वावर ज्यांचा विश्वास नसेल अशांनी पक्ष सो़डून जावे, असा असा सज्जड दम शिवसेनेतल्या नाराजांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. त्यांना पक्ष सोडून जायचं असेल, त्यांनी खुशाल जावं. मात्र मला पक्षात अस्तनीतले निखारे नको आहेत, असं उद्धव म्हणाले. अप्रत्यक्षरित्या शिवसेना नेते मनोहर जोशी आणि मोहन रावले यांना हा इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

नाशिकचे मनसेचे माजी पदाधिकारी सुहास कांदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी पत्रकारांशी उद्धव ठाकरे बोलत होते.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर अविश्वास दाखविला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना दसरा मेळाव्यात व्यासपीठावर बसू दिले नाही.

तसेच मोहन रावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दोघांनाच हा अप्रत्यक्ष इशारा असल्याचे राजकीय पंडिताचे म्हणणे आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 29, 2013, 13:49


comments powered by Disqus