मनसेची मागणी, कोळसा घोटाळा मंत्री राजीनामा द्या, mns wants coal scam minister resignation

मनसेची मागणी, कोळसा घोटाळा मंत्री राजीनामा द्या

मनसेची मागणी, कोळसा घोटाळा मंत्री राजीनामा द्या
www.24taas.com, नाशिक

कोळसा घोटाळ्यात हात काळे झालेल्या राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी पहिल्यांदाच मनसेनं केली. त्यामुळे आता मनसेने कोळसा घोटाळ्यावरही आवाज उठविला आहे.

राज ठाकरेंच्या आदेशानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं मनसे आमदार वसंत गीतेंनी सांगितलं आहे. सध्या राज ठाकरे हे मुंबई हिंसाचारानंतर काढलेल्या मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या वादानंतर महाराष्ट्रासह भारतात त्याचे पडसाद उमटले होते.

आदर्शपाठोपाठ राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे समोर येत असल्यानं या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळं भ्रष्ट मंत्र्यांनी पायउतार व्हावं अशी मागणी मनसेनं केलंय.




First Published: Saturday, September 8, 2012, 20:50


comments powered by Disqus