Last Updated: Thursday, November 28, 2013, 16:32
www.24taas.com, झी मीडिया, गोंदियापुन्हा मुलगीच जन्माला आली म्हणून जन्मदात्या आईनेच आपल्या अवघ्या चार दिवसांच्या चिमुकलीला विष देऊन मारून टाकलंय. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातली ही आणखी एक उघडकीस आलेली घटना...
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील तीरखेडी गावात ही घटना घडल्याचं समोर आलंय. या बातमीनं परिसरात एकच खळबळ उडालीय. लक्ष्मी पटले असं या मातेचं नाव असून या महिलेला पहिल्या दोन मुली आहेत.
शव विच्छेदनातील प्राथमिक अंदाजानुसार, काही विषाचे अंश ह्या चिमुकलीच्या शरीरात सापडले आहेत. या प्रकरणी चिमुकलीच्या आईवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेनं आपला गुन्हा कबूलही केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, November 27, 2013, 23:28