मुंबई-हावडा एक्स्प्रेसच्या बोगीला चाळीसगावजवळ किरकोळ आग

मुंबई-हावडा एक्स्प्रेसच्या बोगीला चाळीसगावजवळ किरकोळ आग

मुंबई-हावडा एक्स्प्रेसच्या बोगीला चाळीसगावजवळ किरकोळ आग
www.24taas.com, विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव

मुंबई-हावडा एक्स्प्रेसच्या बोगीला सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास किरकोळ आग लागली. या आगीत कोणतीही जिवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हिरापूरजवळ मुंबई-हावडा एक्स्प्रेस आली असतांना ही घटना घडली. बोगीतील फॅनजवळ शॉर्ट सर्किटने आग लागली.

ही आगनंतर पसरली आणि अग्निशमन दलाला यांची माहिती मिळाल्यानंतर, चाळीसगाव अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आली. या घटनेनंतर चाळीसगाव स्थानकाजवळ दुसरी बोगी जोडून, ही गाडी मार्गस्थ करण्यात आली.

First Published: Monday, January 6, 2014, 16:19


comments powered by Disqus