जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याची हत्या, Murder in Nashik Jail

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याची हत्या

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यातील आपापसातील वैमनस्यातून दोन जाणावर हल्ला झालाय. यात एका कैद्याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे.

मयत झालेल्या गुन्हेगार कैद्याचं नाव विशाल बाळसाहेब चौधरी असून गंभीर जखमी झालेल्या विजय इप्परवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरूयत. पगार नावाच्या कैद्याशी दोन तीन दिवसापूर्वी भांडण झालं होतं. याचा वचपा काढून मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास झोपेतच हा हल्ला केल्याचं बोललं जातंय.

हल्लेखोर मनमाडचा असून मयत नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी इथला राहणारा आहे. हे सर्व जण खून प्रकरणात कारागृहात जेरबंद होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 16, 2013, 10:57


comments powered by Disqus