Last Updated: Sunday, October 6, 2013, 19:49
www.24taas.com , झी मीडिया, वणी, नाशिकउत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तश्रुंगी देवीच्या नवरात्रौत्सवास लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दोन दिवसात दोन लाख भाविकांनी हजेरी लावली.
अनेक जण खान्देशातून पायी येत असून गुजरातमधूनही भाविक याठिकाणी दर्शनासाठी आले आहेत. यासाठी विशेष २४ तास दर्शनाची व्यवस्था केली आहे. ‘जय माता दी’ आणि ‘सप्तशृंगी माते की जय’ अशा जयघोषात वणी गड दुमदुमला आहे.
रात्रभर गर्दी असल्यानं पोलिसांनी मोठा ताफा तैनात केला आहे. अपघात होऊ नये तसंच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी खाजगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 6, 2013, 19:49