ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर वापर, nashik gram panchyat Election, helicopter

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर
www.24taas.com,नाशिक

ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये आता हेलिकॉप्टरचा वापर सुरु झालाय. ऐकून आर्श्चय वाटवं असेल... पण हे खरं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर झालाय. दरम्यान, ही सफर घडवून आणणाऱे चंद्रकांत गतीर हे बिनविरोध सरपंच झालेत.


सरपंच निव़डीच्या मतदानासाठी सदस्यांची जुळवाजुळव सुरु असताना फूट रोखण्यासाठी सदस्यांना अज्ञात स्थळी नेण्य़ात आलं. त्यानंतर सरपंच निवडणुकीच्या मतदानासाठी या सदस्यांना चक्क हेलिकॉप्टरनं आणण्यात आलं. चंद्रकांत गतीर यांनी हा नवा फंडा शोधुन काढला.

ग्रामपंचायत कार्यालयात येताना कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आल्याचं सांगण्यात येतयं. मुंडेगावच्या ग्रामपंचायत सदस्यांना राजस्थानची सहल घडवण्यात आली होती. हेलिकॉप्टरच्या वापरानं ग्रामपंचायत निवडणुकाही आता खर्चिक होऊ लागल्याचं दिसून येतंय.

First Published: Monday, November 26, 2012, 15:06


comments powered by Disqus