नाशकात उभारणार शिवसेनाप्रमुखांचं मंदिर Nashik- Shiv sena Supremo Balasaheb thakre`s temple will be I

नाशकात उभारणार शिवसेनाप्रमुखांचं मंदिर

नाशकात उभारणार शिवसेनाप्रमुखांचं मंदिर
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतींचं जतन व्हावं, यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आता मंदिर उभारणारेत. हे मंदिर केवळ त्यांचंच नसून शिवमंदिरात या मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.

त्यात विघ्नहर्त्या श्रीगणेशासह या मूर्ती विराजमान होणार आहेत हे विशेष. नगरसेवक प्रवीण नाईक आणि मुक्तांगण जिमखाना मित्रमंडळ यांच्यातर्फे मनमाडमध्ये मंदिर उभारण्यात आले आहे.

२३ ते २५ जानेवारी दरम्यान हा सोहळा होणार आहे. त्यानंतर कार्यकर्ते मुंबईत शिवसेनेतर्फे संकल्प आणि प्रतिज्ञा कार्यक्रमास रवाना होणार आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 20, 2014, 11:00


comments powered by Disqus