Last Updated: Friday, January 11, 2013, 21:13
www.24taas.com, नाशिक नाशिकमध्ये एका विधवेनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
४३ वर्षांची ही महिला सातपूर भागात राहात होती. गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीतून घरी जाताना एक गुंड तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. याबाबत तिनं सातपूर पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती तसंच त्या गुंडाच्या गाडीचा नंबर आणि त्याचा मोबाईल नंबरही पोलिसांना दिल्याची माहिती या महिलेच्या नातलगांनी दिलीय. सातपूर पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या निष्क्रियतेमुळे तिचा बळी गेल्याचा आरोप नातलगांनी केलाय.
दिल्लीत बलात्काराच्या घटनेनंतर महिला अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. खुद्द गृहमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले असतानाही सातपूर पोलिसांनी केलेली ही दिरंगाई एका महिलेच्या जीवावर बेतलीय.
First Published: Friday, January 11, 2013, 21:13