फसवणुकीचा फटका... बँकेचीच तिजोरी रिकामी, nasik NAMKO bank in trouble

फसवणुकीचा फटका... बँकेचीच तिजोरी रिकामी

फसवणुकीचा फटका... बँकेचीच तिजोरी रिकामी

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिकच्या प्रथितयश आणि आर्थिक संपन्न असलेल्या नामको बँकेच्या संचालकांची मनमानी रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला खरा... मात्र, नाशिकारांनी धसका घेत सर्व बँकेतील रकमा काढून डबघाईला आणली आहे.

नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक... म्हणजेच नामको बँक... शहरातल्या नामांकित परिसरात स्वतःच्या मालकीच्या मोठमोठ्या वास्तू असलेल्या बँकेची तिजोरी आता रिकामी झालीय. या बँकेत सध्या गर्दी दिसतेय ती आहे खात्यातल्या सर्व रकमा काढून घेण्यासाठी... अध्यक्षांनी बँकेचा निधी स्वतःच्या संस्थेला वळवून आर्थिक अपराध केलाय. रिझर्व्ह बँकेचा आदेश धुडकावण्याची मुजोरी त्यासाठी कारणीभूत ठरलीय.

सध्या राज्यात बहुतांशी सहकारी पतपेढ्या आणि बँका दिवाळखोरीत आहेत. गेल्या दहा वर्षापासून नाशिक जिल्ह्यात नऊ सहकारी पतपेढयांनी शेकडो लोकांचे पाचशे कोटी रुपये थकविले आहेत. एकेकाळी लोकांसाठी मोठा आधार ठरलेल्या बँका मात्र डबघाईला आल्याय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 12, 2014, 22:44


comments powered by Disqus