Last Updated: Thursday, May 30, 2013, 16:56
www.24taas.com, झी मीडिया, जळगावजळगाव घरकुल घोटाळ्याचे आरोप असलेले परिवहन रांज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठराखण केली आहे. देवकरांवरील आरोप अजून सिद्ध झालेले नाही त्यामुळं त्यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय.
देवकरांनी कोणताही गैरव्यवहार केल्याचं आढळून आलेलं नसून ते या प्रकरणातून दोषमुक्त होतील असा पक्षाला विश्वास असल्याचंही मलिक यांनी सांगितलंय. जळगावातल्या घरकुल घोटाळा प्रकरणी अडकलेल्या परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह 49 आजी माजी नदरसेवक अधिकारी तसंच ठेकेदार आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचं कोर्टात म्हटलंय. कोर्टाने याची नोंद घेतली असून या खटल्याची पुढील सुनावणी आता 12 जूनला होणार आहे. आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर आरोपांचं वाचन करतेवेळी आरोपींनी हे आरोप नाकबुल असल्याचं सांगितलं.
दरम्यान या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आमदार सुरेश जैन यांच्यावरील आरोपांचं वाचन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आर्थर रोडमध्ये झालं. यावेळी सुरेश जैन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. आर्थर रोड जेल अधीक्षकांकडून न्यायालयाने याबाबत लेखी उत्तर मागवलं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, May 30, 2013, 16:56