Last Updated: Tuesday, October 30, 2012, 14:28
www.24taas.com, जळगावघरकुल घोटाळ्यात अडचणीत आलेल्या सुरेश जैन यांच्याविरोधात अपहाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. घरकुल, वाघुर पाणीपुरवठा योजना घोटाळा यासंदर्भातील आरोप त्यांच्यावर आहेच. आता त्यात आणखी नव्या घोटाळ्यांची भर पडली आहे.
सुरेश जैन यांच्यावर आता जिल्हा मध्यवर्ती बँक आणि विमानतळ निर्माण घोटाळा अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात 700 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा फास जैन यांच्या गळ्याभोवती आवळलाय. याप्रकरणी जैन आणि प्रदीप रायसोनींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.जळगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरेश जैन यांच्याविरोधात विविध घोटाळ्यांप्रकरणी आता सहा गुन्हे दाखल झालेत.
नियमबाह्य कामं करुन कोट्यवधी रुपयांचा फायदा आप्तस्वकीयांना करुन दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.. जिल्हा मध्यवर्ती बँकेला 400 कोटींच्या डबघाईला आणल्याचा आरोप होतोय...
First Published: Tuesday, October 30, 2012, 14:28