Last Updated: Wednesday, January 15, 2014, 18:59
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव एका नवविवाहितेच्या तोंडावर कपडा बांधून तिला विहिरीत ढकलून तिची हत्या करण्यात आल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील मांडका तालुक्यात घडलीय. याप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
मांडका तालुक्यातील धानोरा येथील समाधान पांडुरंग वावगे यांच्या वर्षा या मुलीचा विवाह गेल्या डिसेंबर महिन्यात खामगाव इथल्या सुदर्शन किसन निमकर्डे याच्यासोबत झाला होता. लग्नाला महिनाही पूर्ण होत नाही तेव्हाच वर्षाला सासरच्यांकडून हुंड्यातील उरलेली रक्कम माहेरहून आणण्यासाठी तगादा लावणं सुरू झालं होतं, असा आरोप वर्षाच्या वडिलांनी केलाय.
यानंतर पोलिसांनी किसन निमकर्डे सासरा, प्रमिलाबाई किसन निमकर्डे सासू, लक्ष्मण किसन निमकर्डे जेठ, गीताबाई लक्ष्मण निमकर्डे जेठाणी तसेच पती सुदर्शन किसन निमकर्डे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 15, 2014, 18:59