Last Updated: Saturday, October 6, 2012, 22:43
www.24taas.com, जळगावजळगाव पालिकेच्या 29 कोटी 59 लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला.
न्यायालयाने दुसऱ्यांदा त्यांचा जामीन फेटाळलाय. सुरेश जैन यांना वैद्यकीय उपचाराची मुभा यापुर्वी कोर्टानं दिली आहे. त्यामुऴे जैन यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जैन यांचा जामीन फेटाळल्यामुळे त्यांची पुन्हा जळगाव जिल्हा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता आहे.
बहुचर्चित घरकूल गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन नगराध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्यासह बिल्डर आणि अनेक नगरसेवकांवर गुन्हे दाखल झालेत.
First Published: Saturday, October 6, 2012, 22:43