नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, On sexual violence against younger girls in Nashik

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

गंगापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर सख्ख्या भावासह चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिच्या काकाचाही समावशे होता.

बिगारी काम करणाऱ्या तेलगू कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर हा अमानुष प्रसंग ओढवल्याची माहीती सरकारवाडा पोलिसांनी दिली. या प्रकरणी चौघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एप्रिल अखेरपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार सुरू होता. संबंधित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर ही धक्कादायक घटना पुढे आली.

राजू हनुमंत मालू, राम गुलप्पा मालू, नरेश व्यंकप्पा भंडारी आणि प्रभाकर दिनाप्पा हरिजन या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यात संबंधित मुलीचा सख्खा भाऊ आणि काकाचाही समावेश आहे. त्यांपैकी भाऊ फरारी झाला आहे. शेजारच्या दोघांनीही तिच्यावर एप्रिलअखेरपासून 8 मेपर्यंत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 12:10


comments powered by Disqus