रेल्वे प्रशासनाने केला कांद्याचा वांदा! Onion problem in North India

रेल्वे प्रशासनाने केला कांद्याचा वांदा!

रेल्वे प्रशासनाने केला कांद्याचा वांदा!
www.24taas.com, नाशिक

भारतीय रेल्वे प्रशासनानं कांद्याचा वांदा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळं उत्तरेत कांदा पोहचू शकलेला नाही. त्यामुळं उत्तरेतल्या राज्यांत कांदा महागला आहे.

कुंभमेळ्याचे कारण दाखवून रेल्वे वॅगन रोखण्यात आल्यात. त्यामुळ कांद्याचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे नाशिकचा शेतकरी त्रस्त आहेत. तर दुसरीकडे निर्यातबंदी केल्यानं नवी मुंबईत कांद्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. गेल्या आठवड्यात कांद्याचे चढे दर होते. पण निर्यातबंदीनंतर कांदा १६ ते १८ रुपये किलो झाला.

शेतीचा खर्च निघत नाही, डीझेल पेट्रोलचेही भाव वाढले आहेत. त्यामुळे कांद्याला २० ते २१ रुपये किलो भाव मिळायला हवा, असं शेतक-यांचं म्हणणं आहे.

First Published: Tuesday, February 5, 2013, 21:24


comments powered by Disqus