नाशिकच्या एटीएममध्ये भलत्याच नोटा!, outdated notes in ATM

नाशिकच्या एटीएममध्ये भलत्याच नोटा!

नाशिकच्या एटीएममध्ये भलत्याच नोटा!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

ऐन दिवाळीत एटीएममधले पैसे संपल्याच्या अनेक घटना आजपर्यंत समोर आल्यात. पण नाशिकमध्ये वेगळीच घटना घडलीय. एटीएममधून चलनातून बाद झलेल्या ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशा नोटा मिळाल्यानं ब-याच जणांना कुठलीच खरेदी करता आली नाही. अनेकांना भाऊबीजेचं गिफ्टही घेता आलं नसल्याची तक्रार आहे

आशिष बेलदार आणि मयूर हंडगे यांनी सोमवारी चार तारखेला अशोकस्तंभाजवळच्या एसबीआय एटीएममधून २० हजार रुपये काढले. त्यात जवळपास १५ हजार रुपयाच्या ५०० रुपयांच्या नोटांवर चांदीची तार असल्याचं आढळून आली. रिझर्व बँकेनं अशा नोटांना चलनातून बाद केलंय.बँकेनं नोटा बदलून देण्याची तयारी दाखविलीय. पण एटीएममध्ये अशा नोटांचा भरणा झालाच कसा, असा प्रश्न उपस्थित होतोय.

एटीएमवर जरी बँकेचं नाव असलं तरी त्यात पैशांचा भरणा करण्याची जबाबदारी खाजगी संस्थेला देण्यात आलीय. त्यामुळे बँकेचा थेट संबंध येत नसल्याचा दावा व्यस्थापनानं केलाय. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

भविष्यात असे प्रकर घडणार नाहीत, यासाठी काय दक्षता घेतली जाते, हे महत्त्वाचं ठरणार आहे. पण ऐन दिवाळीत झालेल्या मनःस्तापाचं काय, असा प्रश्न नाशिककर विचारतायत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 6, 2013, 17:55


comments powered by Disqus