Last Updated: Monday, September 24, 2012, 14:05
www.24taas.com, नाशिकजलसंपदा विभागातील मुख्य अभियंता विजय पांढरेंनी त्यांच्या खात्याताली घोटाळे चव्हाट्यावर मांडल्यानं अभियंत्यांचा रोष ओढवून घेतलाय. मागील वीस वर्षात 60 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा पांढरेंनी केलाय. राज्यातील 90 टक्के उपसा सिंचन योजना बंद असल्याचं त्यांनी तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट केलंय. वादग्रस्त तेरा विषयांवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यानीच केल्याने चांगलीच खळबळ उडाली
पांढरे पत्रानं जलसंपदा विभागाच्या कारभाराचे धिंडवडे काढलेत. जलसंपदा विभागातील मेरी संशोधन संस्थेत महाराष्ट्र प्रशिक्षण प्रबिधीनीचे मुख्य अभियंता असलेल्या विजय पांढरेंनी पाटबंधारे अधिकारी, राजकीय नेते आणि ठेकेदार कशी लूट करताहेत हे स्पष्ट केलंय. मांजरपाडा प्रकल्प, गोसीखुर्द ,तापी पाटबंधारे,कोकणातील योजना आणि कृष्णा खोऱ्यातील अनेक धरणांच्या बांधकामातील गोंधळ त्यांनी उघड केला आहे. खोऱ्यात पाणी उपलब्ध नसताना दर्जाहीन कामे केली जात असून पन्नास कोटीचे पाचशे कोटीत केले जात असल्याचं गंभीर आरोप त्यांनी केलाय.
उपसा सिंचन योजना पांढरा हत्ती ठरल्याने राज्यातील ९० टक्के योजना बंद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. उपसा सिचन महामंडळाचा कारभार बोगस असल्याचं त्याचं म्हणणं आहे. अवाजवी सिमेंट आणि स्टीलचा वापर करण्याच्या नावाखाली दिवसाढवळ्या लूट सुरु असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय.
भ्रष्टाचार आणि गैरकारभारा विरोधात लढणा-या पांढरे यांची तापी पाटबंधारे महामंडळातून बदली करत त्यांना बाजूला टाकण्यात आले आहे. मात्र विजय पांढरे त्यांच्या विभागातील बाजीराव सिंघम ठरले आहेत
First Published: Monday, September 24, 2012, 14:05