धुळ्यात पोलीस हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल, police attack In dhule

धुळ्यात पोलीस हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

धुळ्यात पोलीस हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल
www.24taas.com,धुळे

धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. एपीआय धनंजय पाटील यांच्या तलवारीचे वार करून हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोर देवा आणि भूषण सोनार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.

विशेष म्हणजे हे दोघे हल्लेखोर राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांची मुले आहेत. जुन्या धुळ्यात ही घटना घडलीय. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर दोन गटात वाद सुरू असल्याची माहिती एपीआय पाटील यांना मिळाली. त्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह जुने धुळे भागात गेले. त्यावेळी दोन गटातला वाद मिटवत असताना त्यांच्यावर अचानक तलवारीने हल्ला झाला.

पोलिसांनी त्यांच्यासोबत कॅमेराही नेला होता. गुन्हा दाखल झालेले आरोपी पोलिसांच्या कॅमेऱ्यात कैद झालेत. हल्लेखोर देवा आणि भूषण सोनार यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिलीय. यावेळी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी झी 24 तासच्या माध्यमातून शहरात शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

First Published: Wednesday, March 27, 2013, 16:21


comments powered by Disqus