Last Updated: Wednesday, March 13, 2013, 17:28
www.24taas.com, नाशिकनाशिकच्या दसक पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या जगन्नाथ खंडू सोनवणे या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सकाळी पावणे दहाच्या सुमारास सोनवणे यांच्या मुलीने त्यांना पोलीस चौकीत गाडीवर सोडलं.
चौकीत पोहचल्यावर चक्कर येत असल्यानं त्यांनी मुलीला पाणी देण्यासाठी सांगितलं मुलगी पाणी शोधात असतानाच सोनवणे यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून एक राउंड फायर केला. उजव्या बाजूने झाडलेली गोळी दुसऱ्या बाजून बाहेर पडल्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनवणे यांना त्यांच्या मुलीने आणि एका हवालदारान खाजगी रुग्णालयात दाखल केलं.
मात्र उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचं रुग्णालय व्व्स्थापानन सांगितलं. आत्महत्येचे कारण अद्याप अजून स्पष्ट झालं नसून नातेवाईकांची चौकशी सुरु असल्याची पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
First Published: Wednesday, March 13, 2013, 17:28