`वाईन`च्या विदेशी गुंतवणुकीला खड्ड्यांचं `बुच`! Potholes at Nashik affects foreign Investment

`वाईन`च्या विदेशी गुंतवणुकीला खड्ड्यांचं `बुच`!

`वाईन`च्या विदेशी गुंतवणुकीला खड्ड्यांचं `बुच`!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

वाईन कॅपिटल अशी नाशिकची ओळख..... मात्र नाशिकचे रस्ते हा प्रयत्न हाणून पाडत आहेत. रस्त्यांसारख्या मुलभूत सोयी नसल्यानं विदेशी गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या नाशिकमध्ये असंच घडतंय.....

पोर्तुगालचे उद्योजक जोसे रामाल्डो वाईन कंपन्यांना कॉर्क म्हणजेच वाईनच्या बाटल्यांना लावण्याची झाकणं (बुच) पुरवतात. जगभरातल्या वाईन कंपन्यांमध्ये पोर्तुगालच्या कॉर्कची मागणी असते. नाशिक वाईन कॅपिटल म्हणून देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण करतंय. त्यामुळे रामाल्डोसारख्या उद्योजकांची पावलं नाशिककडे वळतायत. पण त्यांच्या या वाटचालीत नाशिकमधले खड्डे अडथळा निर्माण करतायत. गेल्या वर्षीही नाशिकच्या रस्त्यांवर असेच खड्डे होते, यावर्षी त्यात जराही सुधारणा झाली नाही, अशी नाराजी रामाल्डो यांनी व्यक्त केलीय.

पर्यटन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रस्ते खराब आहेत. पर्यटन मंत्री मात्र खड्डेमुक्त रस्ते करणं, ही महापालिकेची जबबदारी असल्याचं सांगतायत. नाशिकमध्ये वाईन उद्योगाला पोषक वातावरण असल्यानं वाईनरी बहरल्यात. मात्र रस्त्यांसारख्या मुलभूत सोयी सुविधाच नसतील तर त्याचा विपरित परिणाम विदेशी गुंतवणुकीवर होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 5, 2013, 19:08


comments powered by Disqus