Last Updated: Monday, February 25, 2013, 18:54
www.24taas.com, चाळीसगावचाळीसगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत प्रदीप निकम यांना सर्व नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रदीप निकम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगावच्या सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत राष्ट्रवादीने त्याच्यावर उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी टाकली.
समाज सेवेची आवड लहानपणापासून होती. घरात तसे वातावरण होते. गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या कामाची ही पोहच पावती असल्याचे प्रदीप निकम यांनी या निवडीनंतर झी २४ तासशी बोलताना सांगितले.
First Published: Monday, February 25, 2013, 18:43