Last Updated: Thursday, September 19, 2013, 20:43
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असणा-या गोदापार्कचं खाजगीकरण आता रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यामतून करण्यात येणार आहे.
आज जादा विषयात हा गोदापार्क खाजगीकरणाचा विषय घुसवण्यात आला. अखेर चर्चेनंतर त्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली. मात्र गोदापार्क मुळातच पूर रेषेच्या आत येतोय. हा परिसर नव्यानेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या शहर विकास आराखड्यात ‘नो डेव्हलपमेंट’ झोनमध्ये येत असल्यानं या विषयावर सभागृहात मोठी खडाजंगी होणं अपेक्षित होत.
मात्र राष्ट्रवादी वगळता काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षाची धार जरा कमीच दिसली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, September 19, 2013, 20:43