राज ठाकरे लागले कामाला, चार दिवसांचा दौरा!, raj thackeray 4 day tour in nashik

राज ठाकरे लागले कामाला, चार दिवसांचा दौरा!

राज ठाकरे लागले कामाला, चार दिवसांचा दौरा!

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळेच पक्ष कामाला लागले असताना मनसेही आता मागे राहिलेली नाही. महापालिकेतली पहिली सत्ता, तीन आमदार आणि ४० नगरसेवक देणा-या नाशकात राज ठाकरेंचा चार दिवस दौरा आहे...

मनसेची उद्या राजस्तरीय पदाधिकारी आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक होतेय. या दौ-यात राज ठाकरे काही लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता आहे..... राज यांच्या चार दिवसांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे स्थानिक पदाधिकारी चांगलेच तयारीला लागलेत. सगळं शहर मनसेमय करण्याचा प्रयत्न केला जातोय.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत पार पडलेली बैठक, आपचा वाढता विस्तार आणि महायुतीमध्ये चौथ्या भिडूच्या रुपाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झालेला समावेश या सर्व राजकीय घडमोडींवर राज काय बोलतात याकडे लक्ष लागलंय


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014, 21:13


comments powered by Disqus