Last Updated: Monday, November 5, 2012, 11:58
www.24taas.com,जळगावमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं दुस-यांदा जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला आहे.
मुंबईत परप्रांतियांविरूद्ध छेडलेल्या आंदोलनाप्रकरणी राज यांना १२ जानेवारी २००९ मध्ये रत्नागिरीत अटक करण्यात आली होती. त्यावेळी राज यांच्या आंदोलनाला जळगावातूनही मनसे कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला होता.
राज ठाकरेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती त्यानंतर राज ठाकरेंह मनसेच्या चार कार्यकर्त्यांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान कोर्टाच्या तारखांना सतत गैरहजर राहिल्यानं राज ठाकरेंसह चौघांना यापूर्वीही ४ एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याबाबत जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं होतं.
First Published: Monday, November 5, 2012, 11:50