राज ठाकरे नाशिककरांना दिलेलं अश्वासन विसरले? Raj Thackeray on Nashik Tour

राज ठाकरे नाशिककरांना दिलेलं आश्वासन विसरले?

राज ठाकरे नाशिककरांना दिलेलं आश्वासन विसरले?
www.24taas.com, नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौ-यावर आहेत. नाशिककरांनी सत्ता दिल्यास दर महिन्याला नाशिकला भेट देऊन कामकाजाची पाहणी करेनं अस आश्वासनं देणा-या राज ठाकरेंची गेल्या 9 महिन्यांतील ही केवळ दुसरी भेट आहे.

राज यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली. मात्र भेटीत काय झालं, कुठल्या विषयांवर चर्चा झाली याबाबत काहीही न बोलता राज यांनी मौन बाळगण्यातच धन्यता मानली. सुरवातीला आयुक्त, महापौर, आमदार, महापालिका सभागृह नेत्या यांच्यात चर्चा झाली. मात्र त्यानंतर आयुक्त आणि राज ठाकरे दोघांमध्येच काहीकाळ चर्चा झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या तज्ञांच्या समितीनं नाशिकची पाहणी करुन नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच आगामी सिंहस्थ कुंभमेळा, काही नवीन प्रकल्प शहरात राबविता येतील का याची चाचपणी केली होती.

त्या पार्शवभूमीवर राज ठाकरेंनी आज मनपा आयुक्तांची भेट घेतली. उद्या याचं संदर्भात आर्किटेक्ट, शहराची पाहणी करणा-या समितीचे सदस्य आणि मनपा प्रशासनामध्ये बैठक होणार आहे.

First Published: Tuesday, November 6, 2012, 20:30


comments powered by Disqus