Last Updated: Saturday, May 10, 2014, 20:11
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकलोकसभा निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौ-यावर आलेत. आज त्यांनी सर्व नगरसेवकाशी वन टू वन चर्चा करून त्यांची तोंडी परीक्षाच घेतली.
लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार कसा केला, किती लोकापर्यंत पोहोचलात या प्रश्नासह प्रभागात कुठली विकास काम सुरु आहेत, जी काम सुरु आहेत ती जनतेपर्यंत का जात नाही. लोकांची नाराजी का आहे अशा प्रश्नांची सरबत्ती करून शिलेदारांच्या कारभाराचा आढावा घेतला.
राज्यात पहिल्यांदा महापालीकेची सत्ता, ४० नगरसेवक, तीन आमदार देणा-या नाशिककडून राज यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र अडीच वर्षापसून नाशिकारांची नाराजी सहन करावी लागत आहे. त्यामुळेच त्यांनी विधासभा निवडणुकीच्या पुर्वी नाशिकवर लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 10, 2014, 20:10