Last Updated: Friday, December 28, 2012, 17:55
www.24taas.com, नाशिक नाशिक जिल्ह्यातल्या सुरगणा तालुक्यातल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आदिवासी खात्याचे आयुक्त संभाजीराव सिरकुंडे यांनी बेजबाबदार विधान केलंय. पीडित मुलीवर बलात्कार झालाच नसल्याचा दावा त्यांनी केलाय.
वैद्यकीय अहवाल आल्याशिवाय बलात्कार झाल्याचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा सिरकुंडेंनी केलाय. मात्र आमचा सिरकुंडे साहेबांना सवाल आहे की जर वैद्यकीय अहवाल आलाच नाही तर मग बलात्कार झालाच नाही असा निष्कर्ष तुम्ही कसा काढला... एका बाजुला आदिवासी आश्रम शाळांची सुरक्षा वेशीला टांगलेली आहे. महिला आश्रमशाळांमध्ये अधीक्षकांची पदे रिक्त आहेत.
या बाबींची पूर्तता करण्याचं सोडून स्वत:च्या त्रुटी लपवण्यासाठी पीडितांच्या तक्रारीवर संशय घेणं कितपत योग्य आहे हे देखील तपासण्याची गरज आहे. आदिवासी खात्याचे आयुक्त संभाजीराव सिरकुंडेनी काय मुक्ताफळे उधळली आहेत
First Published: Friday, December 28, 2012, 16:53