Last Updated: Sunday, October 7, 2012, 21:29
www.24taas.com, नाशिकसिडकोतील सव्वा कोटीच्या दरोडा प्रकरणातील फरार संशयित आरोपी सोनल ऊर्फ लाल्या रोहिदास भडांगेला अटक करण्यात आलीये. नाशिक रोड परिसरातील मोरे मळ्यात आलेला असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
यावेळी त्याच्याकडे रोकड सापडली. आतापर्यंत या प्रकरणात साठ लाख रूपये आणि तीन लाखांचं सोनं जप्त करण्यात आलंय. आरोपींकडून चार मोटारसायकल, दोन चारचाकी वाहनंही जप्त करण्यात आली आहेत.
सिडकोतील उत्तमनगर येथे 27 सप्टेंबर रोजी शिल्पा ब्रोकरच्या कार्यालयातून एक कोटी साडेतीन लाख रुपयांची लूट करण्यात आली होती. गोळीबार करून आणि चाकूचा धाक दाखवून हा दरोडा टाकण्यात. पोलिसांनी शिताफीने तपास करून सात आरोपींना जेरबंद केलंय.
First Published: Sunday, October 7, 2012, 21:27