नाशिकमध्ये पोलिसांच्या वेशात दरोडा, Robbers in Police get up

नाशिकमध्ये पोलिसांच्या वेषात दरोडा

नाशिकमध्ये पोलिसांच्या वेषात दरोडा
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिक शहरात पोलिसांवर तरी विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न नागरिकांना पडलाय. कारण पोलिसांच्या वेशात चोर फिरतायत. आत तर तोतया पोलीस होऊन चक्क दरोडा घालण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. त्यामुळे ख-या पोलिसांसमोरचं आव्हान वाढलंय.

नाशिकमधल्या पोलीस प्रबोधिनीच्या दीक्षांत समारंभात हजारो पोलिसांना स्फुरण देऊन गृहमंत्री माघारी फिरले.... त्यांची पाठ फिरते तोच नाशिकमध्ये मणप्पुरमवर दरोडा पडला.... तोही पोलिसांच्या वेशात दरोडा टाकून दरोडेखोरांनी संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिलंय. दरोडा टाकणा-या पाच जणांना अनेकांनी बघितलं, एका तरुणानं त्यांच्याशी संवादही साधला. मात्र हुबेहूब पोलिसांच्या वेशात असल्यानं त्याला जराही शंका आली नाही. कोण पोलीस आणि कोण चोर हेचं समजत नसल्यानं विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा प्रश्न नाशिककरांना पडलाय.

पोलीस असल्याचं सांगून आजवर महिलांचे दागिने, सोनसाखळी चोरणं, बँकेतून पैसे काढणा-या वृद्धांची लुबाडणूक असे प्रकार घडलेत. त्यामुळे आता नागरिकांनीच सतर्कता बाळगावी आणि पोलिसांकडेही त्यांच्या ओळखपत्राची मागणी करावी, असा सल्ला पोलीस अधिकारी देतायेत.

नाशिकरोड दरोड्यासह इतरही गुन्ह्यातल्या तोतया पोलिसांना जेरबंद करण्याचं आव्हान खरे पोलीस पेलणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण ४८ तासांनंतरही दरोडेखोर शोधण्याची कारवाई सुरु आहे, या व्यतिरिक्त पोलिसांकडे उत्तर नाहीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 18:11


comments powered by Disqus